
करमाळा प्रतिनिधी
पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे मुळ मुद्द्यांपासून भरकटत चाललेली वक्तव्ये करून करमाळा तालुक्यातील जनतेची वारंवार दिशाभुल करणारी वक्तव्ये करीत असुन, ते आदिनाथ कारखान्यावरील सरफेसी कारवाई बाबत तसेच विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या बाबत काहीच वक्तव्ये करीत नसुन या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वायफळ चर्चा वारंवार करत आहेत. आमची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत झालेली बागल+ शिंदे गटाची युती आणि जगताप गटाने दिलेला पाठींबा याशिवाय मोहिते पाटील गटाच्या मुख्य नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य सविताराजे राजेभोसले


यांचेसह अमरजित साळुंखे, नवनाथ झोळ यांची वारंवार केलेली हेळसांड यामुळे कमजोर व खिळखिळ्या झालेल्या पाटील गटाच्या प्रवक्त्याची वक्तव्ये अतिशय हास्यास्पद अशी असुन सर्व नेतेमंडळींच्या व सदस्यांच्या बैठकीतुनच सर्व समंतीने ठरलेल्या फॉर्म्युल्या प्रमाणेच सभापती व उपसभापती यांची निवड झालेली असुन, आम्ही सर्वजण एकसंध असुन एकदिलाने कार्यरत आहोत. दहीगाव योजनेच्या पाण्यासाठी आमचे सहकारी व पंचायत समिती सदस्य भरतभाऊ आवताडे योग्य रित्या लढा ऊभारत असुन, पूर्व भागातील शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी आवाज उठवित आहेत. दहीगावच्या पाण्याचे राजकारण

करून पूर्व भागातील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप जाणिवपूर्वक पाटील गटाकडुन चालु आहे. आज दहीगाव ऊपसा सिंचन योजना रडत पडत कशी बशी चालवली जात असुन, स्वतःचे मर्जीतले अधिकारी नेमुन शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचीत ठेवण्याचे पाप केले जात आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात नियोजन शुन्य कारभारामुळे जनता त्रस्त असुन याकडे दुर्लक्ष करून केवळ टिका टिप्पणी आणि बालिश वक्तव्ये करून मुळ मुददयांपासून जनतेची दिशाभुल करायची एवढेच धोरण सध्या प्रवक्ते तळेकर यांचे स्पष्ट पणे दिसत आहे. चालु वर्षात आमदारांनी किती निधी तालुक्याला मंजुर करून आणला आहे ?.. आदिनाथ साखर कारखान्याला सरफेसी कायद्यानुसार होणाऱ्या कारवाई पासुन कसे वाचवणार ? या महत्वाच्या बाबींकडे त्यांनी लक्ष द्यावे… असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते व करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
