छत्रपती संभाजीनर प्रतिनिधी

इंग्रजी शाळा व संस्थाचालकांच्या शासनाकडे विविध मागण्या प्रलंबित आहे तसेच ज्वलंत प्रश्नांसंदर्भात इंग्लिश स्कूल महासंघाचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रसाद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव येथे शालेय शिक्षण मंत्री यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. सविस्तर चर्चेअंती मंत्री दादा भुसे यांनी महासंघाच्या

पदाधिकारी यांना सांगितले की, इंग्रजी शाळा व संस्थाचालकांच्या विविध मागण्या सविस्तर निवेदनद्वारे शालेय शिक्षण विभागाला तातडीने देण्याचे सांगितले. तसेच त्यांचे खाजगी सचिव यांना सुद्धा लवकरच मंत्रालयात राज्यस्तरीय बैठक लावण्याचे सुचविले आणि या बैठकीला शालेय शिक्षण सचिव, शिक्षण संचालक व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा

निमंत्रित करण्यात यावे व बैठकिचे निमंत्रण इंग्लिश स्कूल महासंघाला देण्यात यावे असे सांगितले. यावेळी नाशिक येथील महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. इंग्रजी शाळांचे प्रश्न निकाली काढावे यासाठी सातत्याने प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, प्रदेश सचिव हरीष शिंदे (सोलापूर), प्रदेश सहसचिव रत्नाकर फाळके (छत्रपती संभाजीनगर), सुदिप देब प्रदेश प्रवक्ता तसेच भगवान पवार, (जिल्हाध्यक्ष) योगेश अंभोरे पाटील, (जिल्हा सचिव) हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *