
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता अकरावी (कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश निश्चित करून प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी केले आहे.

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा १० एप्रिल २०२६ पासून सुरू असून, ३० एप्रिल २०२६ पर्यंत प्राथमिक नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर भाग-१ भरण्याची सुविधा बंद होणार आहे.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाविद्यालयात तज्ञ प्राध्यापकांची समिती नेमण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भाग-१ भरण्यासाठी महाविद्यालयात मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग-२ भरण्याची सुविधाही महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.

दहावी उत्तीर्ण झालेल्या किंवा होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासंबंधी कोणतीही अडचण असल्यास प्रवेश समितीशी त्वरित संपर्क साधावा, जेणेकरून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असेही आवाहन केले आहे.

शाखानिहाय संपर्क क्रमांक :
कला विभाग : प्रा. मनसूके एस.एस. – ९४२०२९६५१०, प्रा. वारुळे व्ही.ए. – ९७६५५८८८६५
वाणिज्य विभाग : प्रा. धिंदळे एम.बी. – ९७६७१६४०५३, प्रा. जाधव एम.डी. – ८२७५९१७३६२
विज्ञान विभाग : डॉ. प्रा. बोडके एच.बी. – ९५५२०५१५१४, प्रा. टोणपे पी.एल. – ९९२१११००७८
अधिक माहितीसाठी पालक व विद्यार्थ्यांनी वरील प्राध्यापकांशी संपर्क साधावा, असे प्राचार्यांनी आवाहन केले आहे.