
करमाळा प्रतिनिधी
माझे आजोबा देशभक्त स्वर्गीय नामदेवराव जगताप यांनी केलेला सामाजिक कार्याचा वारसा असाच निरंतर चिंतामणी (दादा) जगताप, राहुल (भैय्या) जगताप व प्रतापराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पिढी देखील चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन पृथ्वीराज चिंतामणी (दादा) जगताप व विश्वराज राहुल (भैया) जगताप यांनी केले. संपूर्ण देशभरात साजरी होत असलेल्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने करमाळा येथील भव्यदिव्य आयोजित करण्यात

आलेल्या मिरवणुकीमध्ये कै. नामदेवराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने पाणी वाटप कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास उदंड असा प्रतिसाद बहुजन बांधवाकडून व भगिनीकडून मिळाला असे सामाजिक कार्य यापुढे देखील विविध पद्धतीतुन अशाच प्रकारे सुरू ठेवणार असल्याचे पृथ्वीराज जगताप व विश्वराज राहुल (भैय्या) जगताप यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य लांडगे, यश कांबळे, प्रताप रोडे पाटील, आदित्य शीलवंत, निलेश पवार यासह अनेक युवक मित्रांचे

सहकार्य लाभले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुकत्याच साजरा झालेल्या जयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये तीन हजार पाणी पाऊच वाटप, 125 महिला निशुल्क देवदर्शन, महिला व जेष्ठ नागरिक ST सवलत कार्ड 190 जणांचा सहभाग, आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.
