
करमाळा प्रतिनिधी
महापुरुषांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या करमाळा पंचायत समितीतील सदस्यांना, महापुरुषांचा विसर पडला आहे असा आरोप पंचायत समिती माजी सभापती अतुल पाटील यांनी केला आहे. यावेळी सभापती व गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आ. नारायण आबा पाटील गटाकडून सभापती दालनात व गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात बसविण्यात आल्या आहेत. यावेळी मा. सभापती शेखर गाडे, गहीनीनाथ ननवरे, दत्ता सरडे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ कदम आदी जण उपस्थित होते.

