करमाळा प्रतिनिधी

माढा पुर्व मंडलाच्या प्रशिक्षण अभियानामध्ये योगेश बाचल यांनी वैचारिक अधिष्ठान या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टी हा केवळ राजकीय पक्ष नाही हा एक विचार आहे ही एक दृष्टी आहे आणि एक सतत चालणार आंदोलन आहे. पक्षाचे उद्दिष्ट भारताची पुनर्निर्माण आणि बळकटीकरण समृद्ध आणि स्वावलंबी राष्ट्र निर्माण करण्यासाठी आहे.

जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सोशल मीडिया या विषयावर मार्गदर्शन करत संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विचारसरणी जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तसेच कार्यपद्धती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. 

सरचिटणीस सचिन शिंदे यांनी कार्यविस्तार आणि कार्यपद्धती या विषयांवर मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटनेचा विस्तार हा सत्ता मिळवण्यासाठी नाही तर समाजात राष्ट्रीय जाणीव निर्माण करण्यासाठी आहे त्याचबरोबर कार्यपद्धती करताना सुरळीत कामकाज आणि शिस्त महत्त्वाचे असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

करमाळा नगरपालिकेचे गटनेते दीपक चव्हाण यांनी बुथ व्यवस्थापन आणि मन की बात या विषयावर बोलताना सांगितले की, भाजपामध्ये बुध समिती ही संघटनेची सर्वात मूलभूत आणि निर्णायक रचना आहे जी पक्षाच्या तळापासून वरपर्यंतच्या संघटनात्मक रचनेचा पाया तयार करते. याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार मन की बात सारख्या कार्यक्रमाचे सामूहिक आयोजन महत्त्वाचे आहे.

या अभियानाचे सहसंयोजक दत्तात्रय जाधव यांनी भाजपाचा इतिहास या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीची वाढ तीन टप्प्यांमध्ये झाली राष्ट्रवाद, सुशासन आणि लोककल्याणकारी धोरणांच्या आधारे पार्टीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

एस आय आर या विषयावर बाळासाहेब वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सरकारची उपलब्धी (2014 पूर्वीचा भारत व 2014 नंतरचा भारत) या विषयावर राहुल पद्मन यांनी सखोल मार्गदर्शन केले.

सभेची तयारी मी करेन, पण मी वक्ता नसेल. वृत्तपत्रासाठी बातमी मी करेल, पण ती माझ्या नावावर जाणार नाही. निवडणुकीत मी प्रयत्नाची परीकाष्ठा करेन, पण मी उमेदवार असणार नाही. पक्षाकरिता मी झिजेन, पण श्रेय मी घेणार नाही. हार तुरे मानसन्मान माझ्यासाठी नव्हेत, अशा निस्पृह कार्यकर्त्यांचा संच हेच आपले बळ आहे. प्रत्येक कार्य होणारच पण त्यात मी पणाचा अहंकार नसेल, असे समर्पित कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी घडवते असे मंडलाध्यक्ष योगेश पाटील यांनी समारोपीय भाषणात सांगितले.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मंडलध्यक्ष योगेश पाटील तसेच जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या व नव्याने निवडून आलेल्या सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत व एकुण 75 पदाधिकारी निवासी उपस्थितीत होते अतिशय उत्तम रित्या नियोजित प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.

याप्रसंगी मंडल अध्यक्ष योगेश पाटील, माढा पंचायत समिती सभापती पंडित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, जिल्हा परिषद सदस्य मुन्नाराजे मोरे, जिल्हा परिषद सदस्य वंदना कांबळे, पंचायत समिती सदस्या सोनाली माळी, पंचायत समिती सदस्य नितीन झाडबुके, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय मोरे महाराज, दत्ता जाधव, धनाजी लादे, नंदकुमार मोरे, राहुल केदार, प्रताप व्यवहारे, चेअरमन नागनाथ वाघे, शंकर मुळीक इ. आदी मान्यवर व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *