
करमाळा प्रतिनिधी
गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये प्रचंड पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीमा नदीला पूर आला होता. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा टेंभुर्णी अशा अनेक गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यात अनेक गावांचे / शाळांचे देखील खूप नुकसान झाले होते.

सामाजिक क्षेत्रात सेवा कार्याचे माध्यमातून सेवा कार्य करणारी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेने त्यावेळी अनेक गावात आपत्कालीन मदत केली होतीच. पण त्यानंतर देखील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप बेंचेस, ब्लॅक बोर्डस आणि साऊंड सिस्टिम याची मदत केली.
करमाळा आणि माढा या तालुक्यातील म्हैसगाव, संगोबा आणि केवड या तीन गावातील शाळांमध्ये विद्यार्थी / विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली. या तीनही गावातील स्वच्छतागृहांचे हस्तांतरण कार्यक्रम काल दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी करमाळा येथील संगोबा येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम, गट विकास अधिकारी कदम तसेच माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा महैसगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर खुशाल जैन सर, जिल्हा परिषद शाळा प्राथमिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी मुळे आणि केवड येथे निवासी जिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड मॅडम, तहसीलदार संजय भोसले केवड, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थित सेवा भारतीचे प्रांत सचिव प्रदीप सबनीस, प्रांत सह सचिव प्रवीण देशपांडे, प्रांत सामाजिक आयाम प्रमुख सदानंद कुलकर्णी आणि पंढरपूरचे सेवा भारतीचे अध्यक्ष अँड. मिरासदार तसेच अन्य प्रांत पदाधिकार उपस्थित होते.
अखिल भारतीय स्तरावरील सेवा भारती ही संस्था शिक्षण, सामाजिक, स्वावलंबन आणि आरोग्य विषयात अनेक सेवा कार्य चालवत आहेत त्यांनी आपल्या या गावात स्वच्छता गृह बांधून दिली त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे असे मत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सेवा भारतीचे कार्याचा गौरव केला. तसेच केवड येथे प्रांत अधिकारी आव्हाड मॅडम यांनी सेवाभारतीचे कार्याचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सेवा कार्यान मध्ये जी काही मदत लागेल ती मी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे त्यांनी यावेळी सांगितले.
सेवाभारतीचे प्रांत सचिव प्रदीप सबनीस आणि प्रवीण देशपांडे प्रांत सहसचिव यांनी सेवाभारतीचे कार्याचा आढावा घेऊन सेवा भारती ही “सेवा परमोधर्मा” हे ब्रीदवाक्य घेऊन “सेवा सर्वतोपरी” या उद्देशाने सर्व क्षेत्रात शैक्षणिक, आरोग्य, स्वावलंबन मध्ये सेवा कार्य करत असते. तसेच याच बरोबर आपत्काळ मध्ये देखील सामाजिक आयाम चे माध्यमातून कार्य करत असते. आत्तापर्यंत सांगली कोल्हापूर केरळ, आंध्र प्रदेश, आसाम या ठिकाणी देखील सेवा भारतीने पूरग्रस्तांना आपत्कालीन मदत केलेली आहे असे सांगितले.
या तीनही गावांमध्ये स्वच्छतागृहे बांधून विद्यार्थी विद्यार्थिनींची सोय करून सहकार्य केल्याबद्दल सर्व शाळातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सेवाभारतीचे आभार मानले व या सामाजिक कार्यात आमचेही योगदान राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी सर्वांना दिली.
आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे मागे शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक , ग्रामस्थ आणि सेवाभारतीचे श्री.सदानंद कुलकर्णी, सुधीर जवळेकर , तसेच सर्व पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतले.
************************************