करमाळा कुर्डूवाडी नेरले मार्गे बस अचानक बंद, आठ दिवसात सुरू न केल्यास विद्यार्थी सह ठिय्या आंदोलन करणार श्रीमंत-औदुंबर राजेभोसले
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कुर्डूवाडी नेरले मार्गे बस नागरिकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी चालू आहे करमाळा कुर्डूवाडी घोटी मार्गे या दोन्ही बस एकच वेळ असल्याचे कारण दाखवत चालू असलेली बस अचानक बंद केल्यामुळे.प्रवाशांचे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. 25 ते 30 मुली रोपळे येथे शिक्षणासाठी जातात सरकार मुलींना मोफत एसटी सेवा देते एसटी नसल्यामुळे प्रत्येक मुलीला बारा हजार पाचशे रुपये खाजगीबस फी द्यावी लागत आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली तरी देखील एस टी महामंडळ नेरले गावाला बस सेवा देऊ शकत नाही मोठी शोकांतिका आहे.बस नसल्यामुळे गावातील अनेक तरुण- मुला मुलींची लग्न जमत नाहीत.नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी पाच-सहा किलोमीटर बस स्टॉप ला चालत जावे यावे लागते.यामुळे विशेष मुलींचे शिक्षण होत नाही. नेरले गावात शिक्षणाचे प्रमाण यामुळे कमी आहे. यासाठी चालू असलेली बस आठ दिवसांमध्ये सुरू करावी अन्यथा दोनशे विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ सह एस टी कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागेल.होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी एसटी महामंडळ जबाबदार असेल.अशा प्रकारचे लेखी निवेदन एसटी महामंडळ सोलापूर कार्यालय,आगार प्रमुख करमाळा,पोलीस निरीक्षक करमाळा, तहसीलदार करमाळा,यांना देण्यात आले. असल्याची माहिती हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरलेचे माजी सरपंचश्रीमंत-औदुंबर राजेभोसले यांनी दिली आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *