
करमाळा प्रतिनिधी
यात हकिगत अशी कि, दि. १३/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे मिना माणिक मैड रा. शेलगाव ता. परांडा जि. धाराशिव धंदा घरकाम सदर दिवशी फिर्यादी यांची तब्बेत ठिक नसल्याने त्या शेलगाव, परांडा येथुन करमाळा येथे मुलाचे घरी विश्रांती करीता आल्या होत्या त्यादिवशी विश्रांती करून सायंकाळी ५/३० च्या सुमारास मंगळवार पेठ येथे घाडगे यांच्या दवाखान्याकडे जात असताना महादेव मंदीराजवळ आले असता दोन अज्ञात इसम काळया रंगाची युनिकॉर्न सारखी दिसणारे मोटारसायकलवर येवुन फिर्यादी यांचे काही अंतरावर येवून थांबले. त्यावेळी ते दोन अज्ञात इसम फिर्यादी याचे दिशेने वळवुन त्यांचे जवळ आले व सदर मोटार सायकल वर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावुन घेतले व ते दोघेही सदर मोटार सायकल वरून भरधाव वेगाने जुना बायपास करमाळ्याचे दिशेने निघून गेले. तसेच मोटारसायकल चालवणा-या इसमाने हिरव्या रंगाची टोपी घातली होती तर पाठीमागे बसलेल्या इसमाने मिलीटरी रंगाची टोपी घातली होती. तसेच दोघांच्याही पायात स्पोर्ट शुज घातलेले होते व दोघांचेही चेहरे रूमालाने बांधलेले होते. तरी फिर्यादी यावे सांगण्याप्रमाणे त्यांचे हिसकावुन नेलेल्या मिनी गंठन याचे वर्णन १.७५ तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन त्यात दोन सोन्याच्या वाटया त्याला सोन्याची तार व ४ सोन्याचे मनी तसेच त्यास काळेमनी असलेली सोन्याची चैन असे एकुण २,५३,७५०/- रु किंमतीचे सोने हे मंगळवार पेठ करमाळा येथुन दोन अज्ञात इसमाने मोटारसायकल वरून येवुन हिसकावुन चोरून घेवुन गेल्याबाबत करमाळा पोलीस ठाणेस गु.र.नं. २१६/२०२६, भा. न्या.सं. कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याची पाहणी केली असता फुटेजमधील आरोपी निष्पन्न करून त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लखन उर्फ फिरोज अजिज शेख रा. नेवासा फाटा नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा असलेचे निष्पन्न केले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सुचना व मार्गदर्शन करून आरोपी पकडणेकामी पथक रवाना केले. आरोपीच्या मागावर गुन्हे प्रकटीकरण पथक असताना त्यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे लखन उर्फ फिरोज अजिज शेख रा. नेवासा फाटा मुकिंदपुर नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा मिळून आला, सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली देवुन चोरलेले सोन्याचे गंठण काढून दिल्याने गुन्हयातील गेला मालापैकी १०.७८० मिली वजनाचे अर्धवट सोन्याचे गंठण १,३५,८२८/- किं. रु चे मिळून आले आहे तसेच यांत आणखीण आरोपी अटक करणे बाकी असून त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून उर्वरीत माल हस्तगत करीत आहोत. नमुद गुन्हयाचा अधिक तपास पोहेका / ३७५ आरकिले हे करत आहेत.
