करमाळा प्रतिनिधी

श्री रामनवमी उत्सव समिती करमाळा आयोजित श्रीरामनवमी उत्सव प्रभू श्रीरामांची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करून जयघोषात साजरी करण्यात आली.

यावेळी करमाळ्यातील तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, मुख्याधिकारी सचिन तपसे, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. श्रीराम परदेशी, सर्व कारसेवक, सर्व रामभक्त आदी मान्यवर व शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सदर उत्सवास कारसेवक रामहरी कांबळे, भाजपाचे संजय घोरपडे, जगदीश अग्रवाल, जितेश कटारिया, राष्ट्रवादीचे शिवराज जगताप, नगरसेवक प्रशांत ढाळे, युवराज चिवटे,

अतुल फंड, सचिन गायकवाड, युवा उद्योजक निखिल चांदगुडे, संदीप पवार, ॲड. राकेश देशमुख, ॲड.प्रियल अग्रवाल, अर्बन बँकेचे मॅनेजर प्रकाश क्षीरसागर, पत्रकार सूर्यकांत होनप, विशाल परदेशी, जिल्हा परिषद शिक्षक लिंबराज मदने, नितीन होटकर, उमेश माने, गणेश माने, निलेश माने, शिवकुमार चिवटे, समीर हलवाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञासेल तथा वंदेमातरम शक्तीसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास घोलप, ग्लोबल इन्स्टिट्यूटचे शिक्षक व विद्यार्थी, जिद्द करिअर अकॅडमीचे शिक्षक व विद्यार्थी, करमाळा नगरीतील सर्व मान्यवर व नागरिक तसेच श्रीरामनवमी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उत्सवासाठी मराठा मंदिर डेकोरेशनचे दत्तात्रय रेगुडे, डिजिटल प्रतिमांसाठी अक्षय परदेशी, रांगोळी करिता मतीन दळवे, विद्युतरोषणाई व आतिशबाजी करिता कृष्णा मोबाईल तथा फटाका तसेच श्रीरामनवमी उत्सवासाठी सुहास घोलप, युवराज चिवटे, सूर्यकांत होनप, गणेश माने तसेच श्रीरामनवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांसह आदींनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *