करमाळा प्रतिनिधी

आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत या शाळेने सांघिक खेळामध्ये कबड्डी व लंगडी दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. क्रीडा संचलन – तृतीय क्रमांक तसेच सांस्कृतिक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.

वैयक्तिक स्पर्धेतील खालील क्रमांक

 प्राजक्ता माने (धावणे) प्रथम क्रमांक, सारांश टेके (लिंबू चमचा) प्रथम क्रमांक, प्राजक्ता माने (लिंबू चमचा) प्रथम क्रमांक, आरवी दुधाट (संगीत खुर्ची) प्रथम क्रमांक, कृष्णा ढाणे (धावणे) चौथा क्रमांक, आरोही गवळी (धावणे) द्वितीय क्रमांक, यश झाकणे (लिंबू चमचा) चौथा क्रमांक, साजिरी कोळी (लिंबू चमचा) प्रथम क्रमांक, अश्विनी दळवी (लिंबू चमचा) चौथा क्रमांक, पृथ्वीराज वाघमारे (लिंबू चमचा) तिसरा क्रमांक, अमन बागवान व पृथ्वीराज सापते (तीन पायाची शर्यत)प्रथम क्रमांक, केदार ढाणे व पृथ्वीराज वाघमारे (तीन पायाची शर्यत) तृतीय क्रमांक.

नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत व उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल फंड यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याधिकारी सचिन तपसे व प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. बक्षीस वितरण समारंभ आज 25/3/2026 रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत, नगरसेवक तथा गटनेते संजय सावंत, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल फंड उपस्थित होते. नगरसेविका सुनीता ढाणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेवक दिपक चव्हाण, रामभाऊ ढाणे, पिलू शेठ इंदलकर, विजय घोलप, जि.प.सदस्या अश्विनीताई चिवटे, बांधकाम समिती सभापती लताताई घोलप, नगरसेविका चैतालीताई सावंत, अश्विनीताई अब्दुले, सुवर्णाताई आलाट, विशाल घोलप, मुख्याध्यापिका माया भागवत मॅडम आणी मान्यवर तसेच एस.एम.सी.अध्यक्ष अलीम बागवान, उपाध्यक्ष मोहिनीताई ढाणे व सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भोसले मॅडम यांनी केले मुख्याध्यापक नवनाथ पारेकर, उपशिक्षक गोदडे सर, जाधव सर तसेच पालक बहुसंख्येने व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेमधील सर्वात जास्त बक्षीसे शाळेस मिळाल्याबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *