करमाळा प्रतिनिधी

करमाळा मतदार संघातील केम आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून जवळपास १० कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर झालेला होता. त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून त्यामधील केम ढवळस रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास आल्यामुळे येथील शेतकरी आणि मतदार मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधानी आहेत. अशी माहिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप तळेकर यांनी दिली आहे तसेच याच रस्त्यावरील भुयारी पुलाचे कामही संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून नुकतेच सुरू झाले असून या कामासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रमुख प्रश्न निकाली निघालेला आहे.

या भागातील दळणवळणाचे मूलभूत प्रश्न येथील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी हे प्रश्न सोडू शकले नव्हते, परंतु हे प्रश्न माजी आमदार शिंदे यांनी सोडवल्यामुळे येथील मतदार त्यांचे कायमस्वरूपी ऋणी राहील असा आशावाद ही तळेकर यांनी व्यक्त केला. मा.आ. शिंदे यांच्याकडून केम मध्ये आतापर्यंत केम-सातोली गुटाळ वस्ती रस्ता १० लाख, बापू साहेब दर्गा वॉल कंपाऊंड ५ लाख, मुलाणी वाडा रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ५ लाख, अण्णा भाऊ साठे नगर समाज मंदिर १५ लाख, राऊत – थोपटे वस्ती ते वडशिवणे तलाव रस्ता मुरुमीकरण करणे ३ लाख, गुटाळ वस्ती रस्ता मुरुमीकरण करणे ३ लाख ही कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.

केम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कुरडे, अच्युत काका पाटील, सचिन काळे, गणेश तळेकर, बाजीराव तळेकर, अक्षय अनभुले, केम ग्रामपंचायत सदस्य, गोरख पारखे, योगेश ओहोळ, सुलतान मुलाणी, दत्तात्रय बिचितकर, योगेश ओहोळ, नीलेश तळेकर, कै.विष्णू तात्या अवघडे, पंचायत समिती माजी सदस्य विष्णू दादा पारखे, गोरख तळेकर, बापू पारखे, सचिन रणशिंगारे, दादासाहेब पारखे, मल्हार अवघडे, हनुमंत अवघडे, भैरु अवघडे, विष्णू ओहोळ मधु अवघडे, बाळू अवघडे, अनंत थोपटे, समाधान गुटाळ यांनी या कामासाठी पाठपुरावा केलेला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले असून ही कामे अखेर पूर्णत्वास येत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *