करमाळा प्रतिनिधी

ओम महिला कला क्रिडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा आयोजित आम्ही मैतरणी मैतरणी नारी सन्मान पुरस्कार आयोजित करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा आज ही समाज मनावर आहे. अशा महिलांना पुरस्कार देऊन गौरव करणे ही सामाजिक जबाबदारी व कर्तव्य समजून मान्यवर महिलांचा यथोचित सन्मान हा खरा महिला दिन आहे म्हणून गेल्या वर्षापासून ओम महिला मंडळ हे महिलांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत आहे.

सुनिता ताईंचा राजकीय गौरवपट, कारकीर्द त्यांची विकास कामे आपल्याला माहिती आहेच. स्व.अनिल भाऊंची खंबीर साथ घरातून मिळणारं सहकार्य यामुळे त्यांची नगराध्यक्ष पदाची वाटचाल प्रशंसनीय झाली होती. त्यांचा शांत स्वभाव आणि आणि चेहऱ्यावरचे समाधान यामुळे त्यांनी माणसं जिंकली म्हणून आज त्यांचा गौरव.

गिरधरदास देवी विद्यालयाच्या निलिमा पुंडे मॅडम यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ आहेत. नाट्य अभिनयाची त्यांची एक वेगळी ओळख आहे. अशा गुरूंचा सन्मान करणे म्हणजे संस्कृती जपणे होय.

अमीन सयानी म्हणून ओळखले जाणारे, छोटीशी टपरी चालवून,रिक्षातून जाहिरात करत आपला संसार चालवणारे सतिश शिंगाडे परिचित आहेत. पिठाचीगिरणी चालवत सुवर्णा शिंगाडे यांनी मुलांना शिकवले घडवले. हा या दोघांचा संघर्ष आज पुरस्कार बनून समाजा समोर येतोय.

सरोज परदेशी होमगार्डची नौकरी करत आपला चरितार्थ चालवित मुलांना त्यांनी शिकवले मुलींची लग्नं लावून दिली. कितीसा पगार मिळत असेल त्यांना ? अशा सशक्त महिलेचा सन्मान होणे गरजेचे वाटले.

२०२६ पुरस्काराचे मानकरी

सुनिताताई वाशिंबेकर राजकिय गौरव पुरस्कार, निलिमा पुंडे आदर्श गुरुवर्य गौरव पुरस्कार, सतिश शिंगाडे व सुवर्णा शिंगाडे संघर्ष सन्मान पुरस्कार, सरोज परदेशी होमगार्ड सशक्त महिला सन्मान पुरस्कार

दि.२९ मार्च रविवार रोजी दु.४ वा.केमिस्ट भवन येथे नगराध्यक्षा मोहिनी सावंत, सभापती महिला व बालकल्याण समिती करमाळा निर्मला गायकवाड, डॉ.वर्षा करंजकर, डॉ.कविता कांबळे व डॉ.अपर्णा भोसले या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच HPV वैक्सीन गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निर्बंध जनजागृती मार्गदर्शन नामांकित डॉ.कविता कांबळे करणार आहेत. अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा प्रा.अंजली श्रीवास्तव यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *