
करमाळा प्रतिनिधी
महिला सक्षम तरच देश सक्षम असल्याचे महत्वाचे विधान महिला नेत्या ज्योतीताई नारायण पाटील यांनी केले. जेऊर ता. करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या महिला महोत्सवाची सांगता झाली. दि.१७ मार्च पासून सुरू असलेल्या या महोत्सवातील स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतीताई पाटील होत्या तर व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या वंदना दादासाहेब पाटील, नुतन पंचायत समिती सदस्या आदिती अतुलभाऊ पाटील, नुतन पं.स. सदस्या ललीता धनंजय शिरस्कर, अनिता राजाभाऊ जगताप, उषा अर्जुन सरक, शिवांजली योगेश कर्णवर, वंदना बागल

यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्योतीताई पाटील यांचेहस्ते कृषीभूषण दादासाहेब पाटील यांच्या पत्नी वंदना पाटील यांचा मानचिन्ह देऊन आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच वंदनाताई बागल यांना आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने गौरविण्यात आले. या बक्षिस वितरण सोहळ्यात डान्स स्पर्धा सोलो डान्स प्रथम मेघा जाधव, द्वितीय आशा निमगिरे, तृतीय अंकीता वेदपाठक तर ग्रुप डान्स प्रथम युनिटी ग्रुप, द्वितीय प्रियंका पाटील व सुचेता दगडे ग्रुप, तृतीय हॅपी वुमेन्स ग्रुप तर उत्तेजनार्थ केमीस्ट ग्रुप तर रांगोळी स्पर्धा प्रथम अश्विनी बादल, द्वितीय मनिषा उघडे, तृतीय स्वाती व्हरे तर उत्तेजनार्थ अश्विनी सोहनी, दिप्ती कुलकर्णी व स्वाती बोराडे तसेच वक्तृत्व स्पर्धा प्रथम मनिषा वनवे, द्वितीय अपर्णा पाथ्रुडकर, तृतीय सुरेखा शिंदे तसेच उत्तेजनार्थ रेश्मा दुनाखे यांना बक्षिसे देण्यात आली. तर उखाणे स्पर्धेत प्रथम लक्ष्मी घाडगे, द्वितीय वनमाला शिंदे, तृतीय प्रियंका पाटील (होगले) तर उत्तेजनार्थ उज्वला कळसाईत व जयश्री

कांबळे यांनी बक्षिसे पटकावली. तसेच अभिनय स्पर्धा प्रथम नारीशक्ती ग्रुप – मी सावित्री, द्वितीय संध्या हेळकर – मी सिंधुताई सपकाळ, तृतीय अपर्णा पाथ्रुडकर – झांसी की रानी तर उत्तेजनार्थ रोहिणी हेळकर, सुनिता कुलकर्णी व सत्यभामा मोहिते यांनी बक्षिसे मिळवली. तर वेशभुषा स्पर्धेत प्रथम प्रतिक्षा शेटे देशमुख – महाराणी येसूबाई, द्वितीय मनिषा लोंढे- आदिवासी महिला, तृतीय मेघा जाधव – शेतकऱ्याची बायको तर उत्तेजनार्थ कल्पना आखाडे -तमिळ स्त्री या वेशभुषे बद्दल बक्षिसे देण्यात आली. रिल स्पर्धेत प्रथम भाग्यश्री नवले, द्वितीय अपर्णा पाथ्रुडकर व अर्चना कुलकर्णी, तृतीय सुचिता राठोड तसेच उत्तेजनार्थ अंकिता वेदपाठक व संगिता बोराडे या विजयी झाल्या. तर अंताक्षरी मध्ये प्रथम सखी ग्रुप, द्वितीय सतरंगी ग्रुप, तृतीय स्वरगंगा ग्रुप तर उत्तेजनार्थ सहेली ग्रुप यांना बक्षिसे दिली गेली. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रोहिणी सुतार व सुलभा घाडगे यांनी केले तर आभार समृध्दी कुलकर्णी हिने मानले. कार्यक्रमानंतर जेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित महिलांना स्नेहभोजन ठेवण्यात आले होते.