करमाळा प्रतिनिधी

आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेत छत्रपती संभाजी महाराज (छावा) यांच्या थीमने प्रेक्षकांवर केले राज्य. प्रसंग पाहून सर्वांच्या अंगावर शहारे आले. मोठ्या गटातील या गाण्याने प्रथम क्रमांक पटकावला. टाळ्यांच्या आवाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेतील मैदान दुमदुमले. लहान गटात तृतीय क्रमांक मिळवला. क्रीडा स्पर्धेमध्ये संचलन मध्ये तृतीय क्रमांक, लंगडी लहान गट (उपविजेता).

वैयक्तिक स्पर्धा खालील प्रमाणे.

कावेरी चिंचकर (धावणे) द्वितीय क्रमांक, शौर्य सुपेकर (धावणे) द्वितीय क्रमांक, प्रसेनजीत भोसले (धावणे) तृतीय क्रमांक, हर्षदा गायकवाड (धावणे) प्रथम क्रमांक, कैवल्य ननवरे (धावणे) द्वितीय क्रमांक, श्लोक क्षीरसागर (तृतीय) क्रमांक, कावेरी चिंचकर (लिंबू चमचा) द्वितीय क्रमांक, तनुजा सावंत (लिंबू चमचा) तृतीय क्रमांक, यशवर्धन ठोकळ (लिंबू चमचा) द्वितीय क्रमांक, हर्षदा गायकवाड (लिंबू चमचा) द्वितीय क्रमांक, अर्णव दगडे (लिंबू चमचा) प्रथम क्रमांक, कैवल्य ननवरे आरुष राखुंडे (तीन पायाची शर्यत) द्वितीय क्रमांक, राजनंदिनी भुतकर (संगीत खुर्ची) तृतीय क्रमांक.

सांघिक स्पर्धेमध्ये आलेल्या घटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले व वैयक्तिक स्पर्धेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, नगरसेवक तथा गटनेते संजय सावंत व उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल फंड व इतर नगरसेवक आणि मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मुख्याधिकारी सचिन तपसे व प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. सर्व नगरसेवक/नगरसेविका व इतर मान्यवर तसेच सर्व मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका सर्व शिक्षक/शिक्षिका, लिपिक शिवदास कोकाटे तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विक्रम राऊत सर यांनी केले. कार्यक्रम बहारदार झाल्यामुळे सर्व मान्यवर समाधान व्यक्त करीत होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *