
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मेन रोड येथील नामरत्न कॉम्प्लेक्स (शॉप नं. ३) मध्ये ‘नामरत्न सोलर एनर्जी’ या नवीन दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा मा. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
पृथ्वीराज जगताप यांनी या सोलर एनर्जी व्यवसायाचा शुभारंभ केला असून, यामध्ये अदानी (Adani), टाटा (Tata), वारी (Waaree) आणि पॉलीकॅब (Polycab) यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या सोलर सिस्टीम बसवणे व सेवा पुरवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यावसायिक (Commercial), घरगुती (Residential) तसेच शेती पंपासाठी सेल्स अँड सर्व्हिसच्या उत्तम सुविधा येथे मिळतील. तसेच ऑन-ग्रीड (On-Grid), ऑफ-ग्रीड (Off-Grid) आणि हायब्रिड (Hybrid) अशा विविध प्रकारच्या सिस्टीम एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या असून, इन्स्टॉलेशनपासून ते सर्व्हिसिंगपर्यंतची सर्व कामे येथे केली जाणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी (दादा) जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, प्रतापराव जगताप, राहुल (भैय्या) जगताप, अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, जगदीश अग्रवाल, काकासाहेब पाटील, काकासाहेब सरडे यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पृथ्वीराज जगताप, विश्वराज जगताप व नितीन जाधव यांनी केले. सोलर सिस्टीमबाबत अधिक माहिती व सेवेसाठी ७८२०९०६९५० / ९९२२८५९०४८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
