
करमाळा प्रतिनिधी
ब्राह्मण महिला संघाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातो. यावेळी ब्राह्मण महिलांसाठी गीत गायन स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व फनी गेम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा महिला आघाडी माधुरी परदेशी मॅडम उपस्थित होत्या.

वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध साहित्यिका, कवियित्री, समाज सेविका अंजली श्रीवास्तव ह्या होत्या तर गायन स्पर्धेसाठी गायन विशारद, गीता कंठस्थ असलेल्या, भगवत गीतेचे गाढ्या अभ्यासक वीणा देवी यांनी परीक्षण केले. मान्यवरांचे स्वागत ब्राह्मण महिला संघाचे अध्यक्ष निलिमा पुंडे यांनी केले. ब्राह्मण महिला संघाचे सहसचिव शुभांगी खळदकर यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्मण महिला संघाच्या कोषाध्यक्ष आरती सूर्यपुजारी यांनी केले. माधुरी परदेशी, अंजली श्रीवास्तव मॅडम व वीणा देवी यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती देवी व भगवान परशुरामांच्या प्रतिमांचे पूजन झाले. शोभा दिवाण यांनी आपल्या सुस्पष्ट वाणीत गीतेचा 15 वा अध्याय सादर केला. श्री गजानन महाराज मंदिरा साठी सदैव झटणाऱ्या त्यांची सेवा करणाऱ्या कुरुलकर मॅडमचा सन्मान संघाच्या प्रसिद्धी प्रमुख मंजिरी जोशी यांच्या

हस्ते झाला. माधुरी परदेशींचा सन्मान संघाचे अध्यक्ष निलिमा पुंडे यांच्या हस्ते झाला. अंजली श्रीवास्तव मॅडमचा सन्मान ब्राहमण महिला संघाच्या उपाध्यक्ष स्वाती मसलेकर यांच्या हस्ते झाला तर वीणा देवी यांचा सत्कार कोषाध्यक्ष आरती सूर्यपुजारी यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमात “घरोघरी मातीच्या चुली” ही लघुनाटिका माधुरी परदेशी, ललीता वांगडे, निशिगंधा शेंडे, सुनेत्रा कुलकर्णी, मंजिरी जोशी व निलिमा पुंडे यांनी सादर केली. भारतातील मुख्य सणांचे वैशिष्टय दर्शवणारे अप्रतिम नृत्य सारीका पुराणिक, शुभांगी खळदकर, नेहा शास्त्री, माधुरी भणगे व प्रिया परदेशी यांनी सादर केले. वेशभूषा स्पर्धेत 19 स्पर्धक तर गायन स्पर्धेत 23 स्पर्धकांनी भाग घेतला होता. फनी गेम मध्ये 32 स्पर्धकांनी भाग घेतला.
गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक निलिमा पुंडे, द्वितिय क्रमांक मंजिरी जोशी, तृतीय क्रमांक सुनेत्रा कुलकर्णी यांनी मिळवला तर वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मंजिरी जोशी, द्वितीय क्रमांक आरती सूर्यपुजारी, तृतीय क्रमांक विभागून वंदना पाटील व शिल्पा कुलकर्णी यांनी मिळवला तर फनी गेम स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रीती पाटील, द्वितीय क्रमांक नेहा शास्त्री, तृतीय क्रमांक पूजा कुलकर्णी यांनी मिळवला.
यावेळी 65 महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची कुलकर्णी यांनी आपल्या हस्तलिखित स्पष्ट गोड वाणीत करून सर्वांची मने जिंकली. आभार प्रदर्शन मंजिरी जोशींनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निलिमा पुंडे, स्वाती मसलेकर आरती सूर्यपुजारी, मंजिरी जोशी, शुभांगी खळदकर, ज्योती कुलकर्णी, सारीका पुराणिक, प्राची कुलकर्णी व मनोज कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा शेवट अल्पोपहार व आईसक्रीम खाऊन झाला.