करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाती मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी सीबीआय मार्फत होऊन सत्य जनतेसमोर यावे, ही राज्यातील जनतेची व कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. संबंधित विमान दुर्घटना ही केवळ अपघात होता की घातपात, याचा सखोल उलगडा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे युथ आयकॉन आ.रोहित (दादा) पवार हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने व निर्भीडपणे लढा देत आहेत.

त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने Threat Assessment करून त्यांना ‘Z+’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी रोहित दादा यांचे निष्ठावंत व रोहित पवार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य. ता.करमाळाचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम ऊर्फ एम डी पठान यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जमिर भाई सय्यद, रमजान बेग, अमोल सुरवसे, आमिर सय्यद, जावेद पठान, सारंग परदेशी, जगदीश शिंदे, गणेश कोकाटे, अभिजीत चव्हाण, नागेश कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *