करमाळा प्रतिनिधी

दिनांक 20 फेब्रुवारी (स्थळ- भा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला) या दिवशी आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन व प्रतिमापूजन करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. करमाळा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल फंड व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा शिक्षण मंडळचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी केले. विद्यार्थ्यांचा बौद्धिक

विकासाबरोबर शारीरिक विकास होणे आवश्यक असते. क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतो. प्रस्ताविकात त्यांनी विचार व्यक्त केले. गुणवत्ते बरोबर मुलांना स्पर्धेविषयी आतुरता निर्माण झाली पाहिजे. असे विचार व्यक्त करून सर्व शाळांमधील भौतिक सुविधांसाठी नगरसेवक संजय सावंत यांनी आश्वासन  दिले.

सचिन घोलप, संदीप कांबळे, विक्रमसिंग परदेशी हे नगरसेवक तसेच सुनीताताई ढाणे, लताताई घोलप, पूजा ताई इंदलकर व जबिन मुलानी या नगरसेविका आणि विजय घोलप, पिलू शेठ इंदलकर, महेश क्षिरसागर, रियाज कुरेशी शिलराज कांबळे तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विक्रम राऊत यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *