करमाळा प्रतिनिधी

पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना (NSS) शिबिरासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वयंसेवक श्रेयश हर्षद शिंगाडे याची निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांनी श्रेयशचे अभिनंदन करून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी आणि नेतृत्वगुण विकसित करावेत, असे मार्गदर्शन सरांनी केले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. पी. माने यांनी श्रेयशच्या निवडीचा महाविद्यालयाला अभिमान असल्याचे सांगितले. श्रेयश शिंगाडे यास कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मणराव राख तसेच प्रशासकीय अधिकारी संभाजी किर्दाक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व मान्यवरांनी श्रेयशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या यशासाठी प्रोत्साहन दिले.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होण्यास मदत होते. श्रेयशच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या कार्याचा गौरव वाढला असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *