करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील झरे येथील जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलच्या वतीने शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संचालिका स्वाती बिले मॅडम, मुख्याध्यापिका अमृता परदेशी मॅडम, बी.सी. ए. कॉलेजचे हेड परदेशी सर, स्कूल समन्वयक सतिश कोंडलकर सर, क्रीडा शिक्षक तानाजी हरणावळ सर, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

काही मुलींनी शिवरायांचा पाळणा व शिवगीतांवार नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्याविषयी अनमोल विचार व्यक्त केले. विद्याथ्यांनी छत्रपती शिवराय,  महाराणी व इतर मावळयांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. संस्थेच्या संचालिका स्वाती बिले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अनमोल असे मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव युवराज बिले सर यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व भविष्यातील नियोजणांची माहिती दिली.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. मान्यवरांचे  आभार संस्थेच्या सहशिक्षीका नफिसा घोडके मॅडम यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *