
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी २७ जानेवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या खालील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत सर्व प्रश्नांची सोडवणूक करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, यासाठी आज सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी संजय जावीर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
१. रोटेशन पध्दत बंद करून सर्व तालुक्यांतील शिक्षकांचे वेतन १ तारखेला अदा करण्यात यावे.
२.वैद्यकीय बील व भविष्य निर्वाह निधी प्रकरणे ठरावीक मुदतीत मंजूर करण्यात यावीत.

३. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांसह जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची डिसीपीएस कपातीची रक्कम व्याजासह वर्ग करण्यात यावी.
४. अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पध्दतीने काढण्यात यावे.
५. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, मंजूर वैद्यकीय बीले तातडीने अदा करण्यात यावी.
६. मराठी, कन्नड, उर्दू माध्यमाचे रोस्टर मार्चपूर्वी मंजूर करून घ्यावे.
७. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्यात यावेत.
८. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात यावी.
९. विज्ञान विषय शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
१०. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तातडीने करुन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.

वरील प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने २७ जानेवारी २०२३ पासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी बाबासाहेब माने, राजन ढवण, प्रशांत लंबे, राम शिंदे, दत्तात्रय कोकडे, रविंद्र जेटगी, आशिष चव्हाण, सुरेश चव्हाण, सादिक मुजावर, फिरोज मणेरी, राजेंद्र पडदुणे, सुहास माने, उमेश सरवळे, दिपक वडवेराव, गणेश कुडले, बालाजी जाधव, महेश वाघमारे, अजित खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.
