मत मिळवण्यासाठी खोटी आश्वासन देणारा मी आमदार नाही- आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी

प्रवीण अवचर

 गाव भेट दौऱ्या दरम्यान मौजे मांगी येथील ग्रामस्थांच्या प्रश्नांवर आमदार संजयमामां नी दिली सडेतोड उत्तर, गेले महिनाभरापासून तालुक्याचे  आमदार  संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील गावांना गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे ,गावभेटी दौऱ्यादरम्यान गावातील अनेक समस्या असतील त्या सोडविणे गावातील विकास कामाबद्दल माहिती घेणे गटारी ,पाणी, वीज ,रस्ते रजूंना घरकुल उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळा बद्दलचे सुधारणा करणे, गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, प्रत्यक्षात गावातील लोकांसमोर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करणे यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी काढलेल्या गाव भेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावांमध्ये रखडलेल्या विकासाला गती मिळत आहे, आज गुरुवार  दिनांक 19 जानेवारी रोजी रावगाव गटातील विविध गावांना आदरणीय मामांनी भेटी दिल्या या भेटीदरम्यान आदरणीय संजय मामा मांगी येथे आले असताना त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले, कार्यक्रमाची प्रस्तावना मांगी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर यांनी केली, यावेळी सुजित बागल

व ग्रामस्थांनी  संजय मामा यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला, यानंतर ग्रामस्थांनी अनेक समस्यांची निवेदन संजय मामांना दिली ,हि सर्व निवेदन स्वीकारून ग्रामस्थांना त्यांच्या समस्यां च लवकरात लवकर निरसन करू असे आश्वासन दिले ,मांगीगाव चा मुख्य प्रश्न म्हणजे मांगीतलावत कुकडीचे पाणी सोडणे बद्दलचा होता, याबाबत निवेदन सादर केले, असता आमदार संजय मामा यांनी कुकडीचे पाणी मांगी तळ्यात न येणे विषयी अनेक तांत्रिक अडचणी कागदपत्राच्या पुराव्यासह ग्रामस्थांसमोर मांडल्या,तरी या त्रुटी कमी करून येणाऱ्या काळात मांगीतलावात कुकडीसह उजनी धरणाचे पाणी कायमस्वरूपी मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले पुढे बोलताना आमदार संजय मामांनी ग्रामस्थांना स्पष्ट शब्दात सांगितले की मी फक्त मतं मागण्या पुरता गोड बोलत नाही मी करमाळा तालुक्याचा आमदार म्हणून प्रत्येक गावाचा प्रत्येक मतदाराचा मी तेवढाच आदर करतो एखाद्या गावात मला कमी मत पडली म्हणून मी त्या गावावरती दुर्लक्ष न करता इतर

गावांप्रमाणेच त्या त्याही गावाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल किंवा त्या गावाला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यावरती मी जास्तीत जास्त भर देतो.  आमदार संजय मामा शिंदे हे निष्पक्ष आणि निस्वार्थीपणाच राजकारण करतात, हे आजपर्यंत तालुक्यातील जनतेने पाहिलेले आहे, विरोधकांनी केलेल्या टिकांची उत्तर देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून आणि कर्तव्यातून उत्तर द्यायला हवे असे आमदार संजय मामांचे मत आहे, या अगोदर “आमदार आपल्या दारी “व त्यानंतर लगेच “गाव भेट दौरा” असे उपक्रम राबवून तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे आमदार संजय मामांनी इतर राजकारण्यांना दाखवून दिलेले आहे , यावेळी उद्धव दादा माळी तानाजी बापू झोळ, एडवोकेट राहुल सावंत, संभाजी राजे बागल स्वीय सहायक श्री विकास वीर, पत्रकार प्रवीण अवचर  यांचे सह मांगी ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, कु स्नेहल अवचर ,शहाबाई नरसाळे चतुराबाई शिंदे ,ग्रामसेवक  सरडे, आरोग्य सेवक  पवार, तलाठी  ढवळे ग्रा शिपाई संजय सोनवणे पोलीस पाटील आकाश शिंदे , महिला बचत गट प्रतिनिधी  रेखा चव्हाण ,यांच्यासह  मांगी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजर होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *