
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
करमाळा येथील ‘हमाल भवन’ येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पै. सुनिल बापू सावंत, तुकाराम इंदलकर, हुमरान मुलाणी, संदीप कांबळे, सरपंच चंद्रकांत काळे, आजिनाथ भागडे, धनंजय शिंदे, जमीर सय्यद, आझाद शेख, देवा लोंढे, संचालक मनोज गोडसे, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, मयूर देवी, अल्लाउद्दीन शेख, आदींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर करमाळा शहरातून हलगी, ताशा आणि बॅन्जो द्वारे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकीनंतर हमाल भवन याठिकाणी भीमराव लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी करमाळा व तालुक्यातील कष्टकरी, शेतकरी, हमाल, तोलार, दिवाणजी, राखणदार, व्यापारी वर्ग उपस्थित होते. यावेळी नगरसेवक विक्रमसिंग परदेशी, जितेश कांबळे, विनोद महानवर, अमोल शिंदे, छोटू परदेशी, अभय महाजन, संग्राम देशमुख, निलेश सावंत, भाऊसाहेब काळे, राजकुमार सुरवसे, पांडुरंग सावंत, गणेश झोळ, रामा कारंडे, विजय रोडगे सर, उमेश हवालदार, मार्तंड सुरवसे, माऊली सुरवसे, पै. गणेश सावंत, शिंगटे सर, अभय कुंभार, हविन गायकवाड, संदेश उबाळे, शेंडे भाऊसाहेब, महेश मोरे, साजिद बेग उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त अल्पोपहारचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमराव लोंढे, गजानन गावडे, सोपान बारवकर, ज्ञानदेव गोसावी,संतोष कुकडे, अंकुश ढवळे, नानासाहेब मोरे, नामदेव फरतडे, लक्ष्मण क्षीरसागर, प्रमोद गायकवाड, अनिल रासकर, किशोर ताकतोडे, शकील शेख, सचिन चांदगुडे, सतीश खंडागळे, संजय गायकवाड, पप्पू रोडगे, गणेश कांबळे, शिवाजी आवटे, दत्तात्रय धुरेकर, सुभाष शेंडगे, महादेव कांबळे यांनी परिश्रम घेतले.