करमाळा प्रतिनिधी

पांडे, खांबेवाडी, धायखिंडी ग्रुप ग्रामपंचायत यांच्या 15 वित्त आयोगातून सुपनवर वस्ती खांबेवाडी या ठिकाणी नवीन बोरवेल घेण्यात आले. यावेळी पांडे ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष उपसरपंच आदिनाथ उर्फ भैया शिंदे यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर, खांबेवाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष औदुंबर सुपनवर, उपाध्यक्ष भारत लांडगे, भगवान वाघमोडे, भाऊ गरड,

व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. पांडे, खांबेवाडी, धायखिंडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये करमाळा-माढा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नारायण आबा पाटील यांच्या विशेष निधीमधून अनेक विकास कामे सुरू आहेत. कोट्यावधीचा निधी या तिन्ही गावाला आमदार यांच्या सहकार्यामुळे मिळाला. अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत, शाळेसमोर ब्लॉकची कामे चालू आहेत, पाणीपुरवठ्याची कामही चालू आहेत, सर्वांगीण विकासाची कामे या तिन्ही गावांमध्ये प्रगतीपथावर आहेत. विरोधकांना विकास कामातूनच आमदार नारायण पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात आहे. ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *