
सेवा भारतीच्या वतीने संगमेश्वर विद्यालयाला सहकार्य
करमाळा प्रतिनिधी
श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा तालुका करमाळा या प्रशालेमध्ये सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र भागेश्वर निवास सदाशिव पेठ पुणे यांच्या वतीने प्रशालेस पुर्ण मैदान दुरुस्ती व मुला-मुलींसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाचे भूमिपूजन सोहळा सेवाभारतीचे प्रदीप सबनीस सचिव सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र
प्रविण देशपांडे सहसचिव सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत
सदानंद कुलकर्णी पुणे सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र सामाजिक आयाम प्रमुख
सुधीर जवळेकर कोषाध्यक्ष सेवा भारती
किरण चव्हाण सचिव पंढरपूर जिल्हा
अण्णा टकले जिल्हा कार्यवाह पंढरपूर, डॉ श्रीराम परदेशी संघचालक, सहकार्यवाहक प्रविण गायकवाड, श्री रामचंद्र संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी,जिल्हा आपत्ती निवारण सेवा भरती संयोजक संग्रामसिंह परदेशी,सहसंयोजक अर्जुन शेळके सर्वच पदाधिकारी करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार जाधव साहेब पोथरे ग्रामपंचायत तलाठी तसेच पोथरे ग्रामपंचायत सरपंच आदरणीय अंकुशराव शिंदे तसेच बोरगावचे सरपंच व सहसचिव आदरणीय विनय काका ननवरे देवस्थानचे पुजारी तात्या गायकवाड गहीनीनाथ बप्पा गायकवाड तसेच सह्याद्रीचा राखणदारचे पत्रकार राजेशजी गायकवाड सर करमाळ्याचे संघचालक डॉक्टर परदेशी पत्रकार जयंत दळवी साहेब संग्राम परदेशी प्रवीण गायकवाड संबंधित कामाचे ठेकेदार सामाजिक कार्यकर्ते विक्रांत शिंदे निलज गावचे पोलीस पाटील सौ चित्रा राऊत इत्यादी उपस्थित होते या सेवा भारती संस्थेने प्रशालेस या अगोदर पूर्ण साऊंड सिस्टिम सेट व आठ ब्लॅक बोर्ड दिलेले आहेत यानंतर आज पूर्ण मैदान दुरुस्ती व स्वच्छता ग्रह या दोन्ही कामांचे उद्घाटन सेवा भारतीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी सेवा भारतीचे सदानंद कुलकर्णी प्रदीपजी सबनीस पत्रकार राजेश गायकवाड सेवा भरतीचे प्रतापसिंह अण्णा टकले पोथरे गावचे सरपंच शिंदे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले व प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांनी सेवाभारतीचे व सर्वांचे आभार मानले सूत्रसंचालन किरण भागडे यांनी केले.
