
चिवटेंचे पालकमंत्र्यांनी केले अभिनंदन
करमाळा प्रतिनिधी
वीट जिल्हा परिषद गटातून अश्विनी गणेश चिवटे या निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक मा. ना. जयकुमार (भाऊ) गोरे यांनी गणेश चिवटे यांचे मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यावेळी चिवटे म्हणाले की,
भाऊंचे प्रेम, आशीर्वाद व मार्गदर्शन हीच माझ्यासाठी खरी ताकद आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प आज अधिक बळकट झाला आहे.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे,बिटरगावचे मा सरपंच डॉ मुरूमकर, गणेश महाडिक आदीजण उपस्थित होते
