
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षासाठी अश्विनी गणेश चिवटे व करमाळा पंचायत समितीच्या सभापतीसाठी वनमाला चंद्रकांत सरडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. अश्विनी चिवटे या वीट जिल्हा परिषद गटातून १४७३६ मतांनी म्हणजेच तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या आहेत. तसेच त्यांचे पती गणेश चिवटे यांचा तालुक्यात चांगला प्रभाव आहे. चिवटे हे बजरंग दलाच्या माध्यमातून पुर्वी पासुन तालुक्यात परिचित आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजपाची ताकद त्यांनी वाढवली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. गोरगरीब जनतेला दिलासा देण्यासाठी अहोरात्र ते काम करीत आहे. वीज, पाणी, रस्ते आदी

विविध विकास कामे गावागावांत करीत आहे. यामुळे त्यांचे नाव चर्चेत आहे. करमाळा पंचायत समितीच्या सभापतीसाठी वनमाला चंद्रकांत सरडे यांच्या नावाची चर्चा आहे कारण त्या भागात चंद्रकांत सरडे यांचा दांडगा संपर्क आहे तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष असे अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. शेतकरी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणे आवश्यक ती मदत ते चिखलठाण भागात करीत आहे. तसेच मा.उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचा आशीर्वादामुळे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत यामुळे त्यांचे नाव सभापती साठी चर्चेत आहे. अध्यक्षा पदावर चिवटे व सभापती पदावर सरडे यांनी विराजमान व्हावे तरच तालुक्याचा विकास होईल. असे मत मतदारातून व्यक्त होत आहे.
