नव मतदारांना मतदानाची शपथ देऊन मतदान जागृती

करमाळा प्रतिनिधी


जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 करमाळा या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करमाळा तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकामार्फत नव मतदारांना मतदान जागृती शपथचे आयोजन करण्यात आले .
यावेळी नव मतदारांना मतदान करण्यासंबंधी त्याचप्रमाणे आपल्या गावातील भागातील इतर सर्व नागरिकांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यासंबंधी श्री किरण सूर्यवंशी स्वीप नोडल जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करमाळा यांनी आवाहन केले
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री कदम साहेब, विस्तार अधिकारी शिक्षण नलावडे साहेब ,टकले साहेब, श्री राहुल आतकर , महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री किर्दाक सर व महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *