करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वीट तालुक्यात प्रथम,
मिळवले तीन लाखाचे बक्षीस
दिनांक, 15/ 1/2026 रोजी झालेल्या तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने केलेल्या गुणांकनामध्ये जिल्हा परिषदेच्या 218 शाळेमधून वीट शाळेला सर्वाधिक गुण मिळाले आणि त्या गुणांकाच्या आधारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये वीट शाळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक राहिलेली आहे,
गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेच्या अनुषंगाने, जिल्हा परिषद च्या खेड्यापाड्यातील तांडा वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा सर्व सोयीने उपयुक्त व सर्व भौतिक दृष्ट्या सक्षम व निसर्गरम्य विद्यार्थ्यांना आवडणारे व माझी शाळा सुंदर शाळा लावते लळा सानुल्या बाळा, या उक्तीप्रमाणे सुंदर व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण होण्यासाठी शासनाने हे अभियान सुरू केलेले आहे, गेल्या दोन वर्षांमध्ये करमाळा तालुक्यातील ,गोयेगाव ,उमरड त्यानंतर यावर्षी 2026 च्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचे प्रथम क्रमांक जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट या शाळेने पटकवलेला आहे .त्यामुळे गावकऱ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी डॉक्टर श्री अमित कदम साहेब गटशिक्षणाधिकारी श्री नितीन कदम साहेब विस्ताराधिकारी श्री मिनीनाथ टकले साहेब व विस्ताराधिकारी व माजी गटशिक्षणाधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब व सर्व विषय तज्ञ यांच्या कमिटीने तालुक्यातील केंद्र निहाय सर्व शाळेची तपासणी केली असता सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व मुद्द्यांची तपासणी केल्यानंतर गुणांकनामध्ये वीट शाळा तालुक्यातून प्रथम क्रमांकावर राहिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वीट शाळेच्या सर्व शिक्षक बांधवांच्या डोक्यावर त्यानिमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला .
गेल्या दहा वर्षांमध्ये सतत वीट शाळेची प्रगती न थांबता ती टप्प्याटप्प्याने चढत्या क्रमाने वाढत गेलेले आहे . सर्व सोयीने उपयुक्त गुणवत्तापूर्ण सेमी वर्ग असल्यामुळे सर्व शिक्षकांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे आज तागायत वीट शाळेचे पटसंख्या ही केवळ शिक्षक बांधवामुळे टिकून आहे व चांगल्या कामामुळे आदर्श शाळेची प्रगती चढत्या क्रमाने होत चाललेले आहे. या शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण निसर्गरम्य, शालेय परिसर ,खेळ व क्रीडा यामध्ये घेतलेली उत्तुंग अशी भरारी सेमी वर्ग कुठल्याही भौतिक सुविधाची कमतरता नसलेली तालुक्यातील एकमेव शाळा म्हणजे जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट, या सर्व यशांमध्ये तितकाच सिंहाचा वाटा म्हणजे गावकऱ्यांचा आहे आणि सर्व आदर्श शिक्षक बांधवांचा आहे.
असं म्हटलं जातं शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा, अशा पद्धतीची शाळा थेट गावकऱ्यांच्या स्वप्नातील शाळा म्हणजे केंद्र शाळा वीट तयार झालेले आहे.
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेमध्ये वीट शाळेचा प्रथम क्रमांक आल्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी सर्व शिक्षक बांधकाचे या निमित्ताने कौतुक केले आहे. व लवकरच जाहीर होणाऱ्या जिल्हा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *