
कमलाई नगरी
महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडून द्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलू – पालकमंत्री जयकुमार गोरे,
करमाळा – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वीट जिल्हा परिषद गटामध्ये मौजे- वीट या ठिकाणी जाहीर प्रचार सभा संपन्न झाली, या प्रचार सभेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारांना आव्हान केले की तुम्ही भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या या तालुक्यात विकासापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना आम्ही ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देऊ व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असे आव्हान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित नागरिकांना केले,
या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , भाजपा महिला आघाडीच्या रश्मीदिदी बागल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे , युवा नेते दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व उमेदवार उपस्थित होते,
या सभेसाठी वीट जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत मोठी गर्दी केली होती,
पालकमंत्री गोरे यांच्या सभेने वीट जिल्हा परिषद गट व तालुक्यात गणेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे,
