
करमाळा प्रतिनिधी
“नांदेड पासुन करमाळ्यापर्यंत करमाळ्याच्या आगाराची व परिसराची व्यवस्था अतिशय नीटनेटके असून कर्मचाऱ्यांनी सेवा मात्र तत्परतेने देणे आवश्यक आहे”, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक चक्रधर पाटील यांनी केले.
रथसप्तमी निमित्त करमाळा बसस्थानकामध्ये आयोजित प्रवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक वाहतूक अधिकारी पंकज जाधव हे होते तर यावेळी कार्यशाळा अधीक्षक चव्हाण, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष ब्रह्मदेव नलावडे, प्राध्यापक रमेश शिंदे, पत्रकार अशपाक सय्यद, नागेश फसले, कृष्णा गलांडे, अभिजीत पाटील, रामदास कांबळे, महेश भोसले, प्रवीण सूर्यवंशी, सुग्रीव तरंगे, संतोष भिसे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चक्रधर पाटील म्हणाले की, करमाळा आगाराशी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संबंध सातत्याने येत असतात. प्रवाशाच्या अडीअडचणी संदर्भामध्ये समस्या सोडवण्यासाठी करमाळा आगाराचे सहकार्य असते. आगाराच्या संदर्भात ग्राहक पंचायतीने केलेल्या सूचनाचे ते पालन करतात. अधिक सेवा देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक वाहतूक अधिकारी पंकज जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे यांनी केले तर आभार प्रवीण सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी करमाळा बसस्थानकामधील प्रवाशांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तसेच करमाळा आगारात तिळगुळाचे वाटप करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रवाशांनी या रथसप्तमीच्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन या आगाराची सेवा अधिकाधिक कार्यक्षम व्हावी, येथील सोयी सुविधा, सुरक्षा मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध करावे, उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी, प्रातर्विधीची जागा, पिण्याचे पाणी यासंदर्भामध्ये करमाळा आगाराने सतर्क राहून व्यवस्था करण्याचे आवाहन यावेळी प्रवासी फरतडे यांनी व्यक्त केली.
