
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल रोशेवाडी येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचा परिसर तिरंग्याच्या थाटात सजवण्यात आला होता. मुख्य दरवाजावर रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी तिरंगा व तिरंग्यातील फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले होते. सकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक/अध्यक्ष जयंत दळवी व शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी भारत मातेचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. यानंतर ध्वजारोहणाचा व ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत गायन करून भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले.

कार्तिकी दळवी,अर्णव जगदाळे, शिवकन्या कानगुडे, स्वरा माकुडे, आराध्या कांबळे, आदित्य झाडबुके, कार्तिक चव्हाण, श्रावणी कांबळे, सम्राट कांबळे, दीप्ती पवार, ईश्वरी माकुडे, भावेश गोदारा, ओम मोरे, साद घोडके या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
