
करमाळा प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालयीन इमारतीच्या प्रांगणामध्ये बाजार समितीचे उपसभापती प्रतिनिधी, गटसचिवांचे मार्गदर्शक नेते बबनराव मेहेर यांच्या शुभहस्ते ध्वज वंदन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व बाजार समितीचे संस्थापक माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अभयसिंह आवटे यांचे सह बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

