
करमाळा प्रातिनिधी
विद्या विकास मंडळाचे सचिव, मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत वांगी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती वांगी व जेऊर गणा च्या प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी सरांनी बोलताना त्यांनी आपल्याला सर्वांगीण व मूलभूत गोष्टी च्या व इतर अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला केंद्रात राज्यात आपलेच सरकार असून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल, मा.आमदार संजयमामा शिंदे व भाजपा युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या नेतृत्वात आपल्या भागातील मूलभूत गरजा जसे की रस्ते, लाईट, पाणी नियोजन अशा इतर बऱ्याच गोष्टी तत्पर सोडवण्यासाठी आपल्याला भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच कमळ व घड्याळ या चिन्हा समोरील येत्या 5 तारखेला बटन दाबून आपले अधिकृत उमेदवार देशमुख, तकीक, लबडे ताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आव्हान यावेळी केले.

याप्रसंगी शहाजी दादा देशमुख,कल्याण सरडे सर, चंद्रहास बापू निमगिरे, शिवाजीराव बंडगर सर, उमेदवार सोनाली ताई नितीन तकिक, डॉक्टर विजय रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा ग्रामीण अध्यक्ष सचिन पिसाळ, मा. जिल्हा नियोजन सदस्य निळकंठ आप्पा देशमुख, विलास दादा पाटील,लक्ष्मण दादा महाडिक,पांडुरंग आबा जाधव, तात्या मामा सरडे,भारत अण्णा साळुंखे,शिवाजीराव पोळ,सरडे सर,हरिभाऊ डुबल,रोहिदास सातव,नितीन खटके,संजय गुटाळ,सोमनाथ रोकडे,कुलदीप पाटील,रवींद्र वळेकर,नितीन हिवरे,मयूर रोकडे,प्रमोद पाढशे,गणेश तळेकर,संजय कदम,वैभव तळे,अनिल केकान,महेश टेकाळे,महेश शेळके,विष्णू पाटील,नवनाथ केवारे,महेंद्र चौधरी,सचिन देशमुख,राजाभाऊ देशमुख,भाऊसाहेब साबळे,सुहास पोळ,रवी जाधव,आरकिले सर,अॅड. दत्तात्रय सोनवणे,नाना आरकिले,लक्ष्मण केकान,सतीश देशमुख या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन आबा तकीक यांनी केले व आभार नितीन तकीक यांनी मानले.
