करमाळा प्रातिनिधी

डॉ. प्रदीपकुमार (आबा) पाटील यांच्या स्मरणार्थ व आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या विद्यमाने स्माईल डेंटल केअर दातांचा दवाखाना यांच्या वतीने दातांच्या कवळी बसविण्यासाठी विशेष सवलतीचे शिबीर जाधव-पाटील हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर रविवार, दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाधव–पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे संपन्न झाले.=. या शिबिरामध्ये दातांच्या कवळीवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात आली. मुळ किंमत २५,००० रुपये असलेल्या कवळी सवलतीत १२,५००

रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिरामध्ये दातांची तपासणी पूर्णतः मोफत करण्यात आली असून, अनुभवी व तज्ञ दंतवैद्य रुग्णांची तपासणी व उपचार केले. या शिबिरात डॉ. अंशुमान सिंह (B.D.S.), डॉ. प्रविण गायकवाड (M.D.S.), डॉ. सचिन महाबोले (B.D.S.) व डॉ. अजिंक्य वेर्णेकर (M.D.S.) या तज्ञ डॉक्टर यांनी सेवा दिली निरोगी दात व सुंदर हास्य मिळविण्याची ही सुवर्णसंधी याचा नागरिकांनी लाभ घेतला. यापुढे देखील संस्थेच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. शिवानी पाटील, अभिजीत पाटील, अजिंक्य पाटील, तात्यासाहेब जाधव, महादेव भोसले, प्रमोद जगदाळे, राहूल जाधव, शितल पेटकर यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *