
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने शिवसेना तालुकाप्रमुख पदी आळजापूर येथील येथील डॉ. गौतम रोडे तर करमाळा शहर प्रमुख पदी चंद्रकांत राखुंडे यांची नियुक्ती केली आहे. तसेच करमाळा तालुका शिवसेना समन्वयक म्हणून दिनेश घोलप व महिला आघाडी तालुकाप्रमुख म्हणून अश्विनी घोलप यांची नियुक्ती केली आहे. या निवडीचे पत्र शिवसेनेचे करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला असल्याची माहिती रवी आमले यांनी देऊन करमाळा नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले अशांना बाजूला करून नवीन शिवसैनिकांना काम करण्याची संधी दिली आहे.

डॉ. गौतम रोडे हे मोठे उद्योजक असून त्यांचा फायदा शिवसेनेला होईल तसेच चंद्रकांत राखुंडे यांचा नगरपालिकेत झालेला पराभव डोळ्यापुढे ठेवून पुढील नगरपालिकेचे बांधणी करण्याची ही जबाबदारी देण्यात आली.
करमाळा नगरपालिका निवडणुकीत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी प्रचार करून पक्षांचा विश्वासघात केला होता. याचा संपूर्ण अहवाल अहवाल मुख्य नेते एकनाथ शिंदे व सचिव संजय मोरे यांना देऊन त्यांच्या आदेशाने या नवीन नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.