करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदार संघ रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे होते व आता त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम असेल असा

अर्ज भरण्याची तारीख – १६ ते २१ जानेवारी

छाननी – २२ जानेवारी

अर्ज माघारी घेण्याची मुदत – २७ जानेवारी

मतदान – 5 फेब्रुवारीला

निकाल – 7 फेब्रुवारी

सध्या राजकीय हालचालींचा वेग वाढलेला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून, गावोगावी बैठका, संपर्क दौरे सुरू झाले आहेत. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक करमाळा तालुक्यासाठी अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरूवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत महिला सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणांनुसार गट निश्चित करण्यात आले आहेत. करमाळा तालुक्यात सहा जिल्हा परिषद आहेत त्यानुसार जाहीर गट, आरक्षण व त्यातील गावांची यादी पुढीलप्रमाणे.

पांडे जिल्हा परिषद गट (महिला सर्वसाधारण)

गावे – पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, पोथरे, निलज, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, श्रीदेवीचामाळ, तरटगाव, बिटरगाव श्री. दिलमेश्वर, वडाचीवाडी, रावगाव, लिंबेवाडी, वडगाव (उ), वडगाव (द), पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे, मांगी, भोसे,

कोर्टी जिल्हापरिषद गट (महिला सर्वसाधारण)

गावे – कोर्टी हुलगेवाडी, गोरेवाडी, कुसकरवाडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजुरी, दिवेगव्हाण, भिलारवाडी, कावळवाडी, पोंधवडी, विहाळ, केतूर नं. १, केतूर नं. २, पारेवाडी, गोयेगाव, पोमलवाडी, खातगाव, टाकळी कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमरवाडी, हिंगणी

चिखलठाण जिल्हापरिषद गट (सर्वसाधारण)

गावे – चिखलठाण, वाशिंबे, सोगाव, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, कुगाव, केडगाव, झरे, कुंभेज, वरकुटे, सरपडोह, कोंढेज, उमरड, पोफळज, अंजनडोह.

वांगी जिल्हापरिषद गट (महिला सर्वसाधारण)

गावे – वांगी (नं. १ २, ३, ४), भिवरवाडी, सांगवी, ढोकरी, पांगरे, बिटरगाव (वांगी), भाळवणी, कविटगाव, जेऊर, जेऊरवाडी, निंभोरे, लव्हे, शेलगाव (वांगी), शेटफळ, दहिगाव.

वीट जिल्हापरिषद गट (महिला सर्वसाधारण)

गावे – वीट, करमाळा (ग्रामीण), मोरवड, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, वंजारवाडी, हिवरवाडी, रोशेवाडी, पिंपळवाडी, करंजे, भालेवाडी, फिसरे, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, शेलगाव (क), सौंदे.

केम जिल्हा परिषद गट (ना.मा.प्र. महिला)

गावे – केम सातोली, वडशिवणे, मलवडी, कंदर, साडे, नेरले, आवाटी, सालसे, घोटी, आळसुंदे, वरकुटे, पाथुर्डी

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *