
जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबीर
कुंभेज प्रतिनिधी
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाय्रा राजमाता जिजाऊ ( माँसाहेब) यांच्या जयंती निमित्त ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज फाटा या ठिकाणी शिवस्फुर्ती समुह ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष अनिल कादगे यांच्या

नियोजनातुन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले दिवसभरात 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले याबद्दल नियोजन करणारे अनिल शेठ कादगे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे त्यांचे या कार्याबद्दल खुप खुप अभिनंदन तसेच सदर

कार्यक्रमासाठी दिवसभरात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले त्यामध्ये कुंभेज ग्रामपंचायत उपसरपंच संजय तोरमल, सदस्य गुरुदास सुर्वे, महावीर भोसले, अक्रुर शिंदे मेजर, गणेश शिंदे साहेब, मेजर बिभीषण कन्हेरे,या मान्यवरांचं खुप खुप आभार आणि सर्वात महत्वाचे स्वयंस्फूर्तीने रक्तदानामधे भाग घेणारे सर्व रक्तदात्यांचेही खुप खुप आभार

