लिटिल एंजल्स स्कूल, अटल ज्ञान प्रबोधिनी मध्ये बालमहोत्सव

जेऊर प्रतिनिधी

गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी तपोवन कोंढेज रोड जेऊर येथील जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि अटल ज्ञान प्रबोधिनी या शाळांमध्ये जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जन्मदिन यानिमित्ताने बाळ गोपाळांच्या संक्रांति निमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा छोटा बाजार ” बाल महोत्सव ” या रूपात

साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये बहुतेक सर्व भाजीपाला फळे आणि धान्ये ही सेंद्रियच असतील असा अट्टहास धरून तशाच वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या. आज-काल समाजामध्ये विषमुक्त अन्न याकडे जो वाढता ओढा आहे त्याला अनुसरून ही गोष्ट करण्यात आली .यामध्ये सर्व सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय फळे, सेंद्रिय डाळी ज्या मुलांच्या घरच्या शेतातीलच आहेत

अशाच विक्रीस ठेवण्यात आल्या आणि त्यास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वैशिष्ट्यपूर्ण बाजारामध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला. यासोबतच काही विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अन्नपदार्थांचा सर्वांनी

मनसोक्त आस्वाद घेतला .शाळेतील शिक्षक वर्गाच्या या संकल्पनेचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वर्गांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यास पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *