
करमाळा प्रतिनिधी
सोलापुर येथे चालु असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषकामधे करमाळा वकील संघाने दमदार कामगिरी करीत उपविजेते होण्याचा सन्मान राखला. सर्व सामने अतिशय चुरशीने खेळलेल्या करमाळा वकील संघाचे विशेष कौतुकही करण्यात आले. उपविजेते पदासह बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच सिरिज ॲड. विश्वजित बागल यांना तर ॲड. माऊली टापरे यांनाही दोन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी चा सन्मान मिळाला. या संघात ॲड. अमर शिंगाडे, ॲड. शिवराज शेरे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. निखिल

पाटील, ॲड. विश्वजित बागल, ॲड. माऊली टापरे, ॲड.स्वप्नील यादव, ॲड. ओंकार मुसळे, ॲड. किरण वीर, ॲड. विशाल घोलप, ॲड. प्रियाल आगरवाल, ॲड. मनोज कांबळे, शशिकांत शेजुळ, अमोल राऊत, मार्गदर्शक ॲड. सुहास मोरे यांचे सह करमाळा संघाचे पदाधिकारी व क्रिकेट प्रेमींची विशेष उपस्थिती होती. अतिशय खेळीमेळीत झालेल्या सामन्यात बॉलिंग मधे विशाल घोलप, अमर शिंगाडे, शिवराज शेरे, विश्वजित बागल यांचे विशेष कौतुक करण्यात आले. अंतिम सामन्यानंतर ॲड.मिलिंदजी थोबडे, ॲड.भारत कट्टे, ॲड.उमेश मराठे, सोलापुर बारचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड.आळंगे, ॲड. चिंचोळकर मॅडम, ॲड.देशमुख मॅडम, आयोजक ॲड. रितेश थोबडे व सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.