करमाळा प्रतिनिधी  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर एक या शाळेत पुणे येथील रोवेमा कंपनीकडून DELL कंपनीचे दोन संगणक संच आणि Boat कंपनीची साऊंड सिस्टिम असे जवळपास 80 हजार रुपये किमतीचे साहित्य भेट देण्यात आले.

सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या बदलांमध्ये बाळासाहेब बोडखे आणि बिबीशन सातपुते या शिक्षकांनी या शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर या शाळेचा कायापालट करण्याचा चंग बांधला आणि स्वतः पुढाकार घेत काम सुरू केले. शाळेचा परिसर एकदम चकाचक करत शाळा परिवर्तनामध्ये पहिले पाऊल टाकले. आपल्याला गावातील युवकांकडून कसे योगदान घेता येईल याबाबत गावात माणसांकडे चाचपणी सुरू केली आणि पुणे येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत असणाऱ्या अमोल धायगुडे यांच्याकडे यांनी शिक्षकांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत Rovema कंपनीकडून, येथील अधिकारी वर्गाकडून स्वतः योगदान देत खातगाव नं.1 जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी जवळपास 80 हजार किंमतीचे हे साहित्य आणून दिले. त्यामुळे आता या शाळेतील विद्यार्थी संगणकाचे धडे घेणार आहेत. शिवाय दररोज परिपाठ माईकवर होणार आहे ज्यातून विद्यार्थ्यांचे स्टेज डेरिंग नक्कीच वाढेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला.

अचानक येऊन शाळेला केलेल्या या अनमोल योगदानाबद्दल शाळेच्या वतीने अमोल शिवाजी धायगुडे,  त्यांचे सहकारी अधिकारी HOD नवनाथ दरेकर तसेच या मदतीची ही संकल्पना सुचवणारे राजेंद्र शिवाजी धायगुडे यांचा शिक्षक बाळासाहेब बोडखे व बिबीशन सातपुते यांनी छोटेखानी प्रातिनिधिक सन्मान केला. यावेळी अंगणवाडी सेविका, मेजर तात्याबा मोरे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी सुद्धा उपस्थित होत्या. 26 जानेवारीला सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.

त्यांचा आदर्श घेऊन नक्कीच आपल्या गावातील इतरही दानशूर व्यक्ती शाळेला नक्कीच भरभरून सहकार्य करतील आणि आपली खातगाव नंबर 1 शाळा आणखी जबरदस्त आदर्श शाळा, मॉडेल स्कूल बनवण्यासाठी आम्हा शिक्षकांना सहकार्य करतील आणि इतर गावांना देखील प्रेरणा देतील असा विश्वास यावेळी बोलताना दोन्ही शिक्षकांनी व्यक्त केला.

सकारात्मक विचार केला की परिवर्तन कसे सुरू होते याचे प्रेरणादायी उदाहरण खातगाव नं.1 शाळा आहे असे मत करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांनी व्यक्त केले.

शाळेमध्ये सुरू केलेल्या या धमाकेदार परिवर्तनाबद्दल करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि.वि.अ. जयवंत नलवडे, जगताप मॅडम, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सरपंच सुवर्ण मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कोकरे व सर्व सदस्यांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व सहशिक्षक विभीषण सातपुते यांचे विशेष कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *