
करमाळा प्रतिनिधी
जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी शाळा देवीचा माळ करमाळा येथे मा. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनोज राऊत यांनी शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यासोबत जेवण केले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांना कसे सक्षम करता येईल याबाबत संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वृंद यांच्याशी संवाद साधला होता.
