करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथे लवकरच नवीन सिनेमाचे शुटींग चालू करणार आहे अशी माहिती सिनेअभिनेते सैराट फेम तथा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितली आहे.

यावेळी कमलाई नगरीचे संपादक पत्रकार जयंत दळवी यांनी नागराज मंजुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, किल्ला विभाग येथील जुनी नगरपरिषदेची पाहणी करण्यासाठी आलो आहे. तसेच नवीन सिनेमा बाबत लवकरच आपणास योग्य ती माहिती देतो. यावेळी दळवी यांनी सांगितले की, मी बाजूलाच राहत आहे जुनी नगरपरिषदेचा काही भाग विस्कळीत झाला होता त्यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर काही प्रमाणात नगर परिषदेचे डागडूजी करण्यात आली होती. यावेळी मंजुळे यांनी सांगितले की, योग्य ती दुरूस्ती नगर परिषदेची करून शुटींग चालू करणार आहे. यावेळी त्यांचे मित्र नागेश झांजुर्णे व त्यांचे काही कलाकार सहकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *