करमाळा प्रतिनिधी

घोटी येथील पी.एम. श्री. जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत सर्वांचा अभिमान उंचावला आहे. विविध खेळप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत घोटी शाळेने विजेतेपदाची अखंड मालिका कायम ठेवली. मुला-मुलींनी खेळ कौशल्य, शिस्त, टीमवर्क आणि जिद्दीच्या जोरावर एकापेक्षा एक उत्कृष्ट अशी कामगिरी नोंदवत स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय यश :

कबड्डी मोठा गट – मुली द्वितीय क्रमांक, खो-खो मोठा गट – मुली प्रथम क्रमांक, लहान गट – मुली द्वितीय क्रमांक, लंगडी मोठा गट – मुले प्रथम क्रमांक, मोठा गट – मुली प्रथम क्रमांक, धावणे स्पर्धा लहान गट – १०० मी. सई किशोर ननवरे – प्रथम क्रमांक, लहान गट – २०० मीटर आदर्श अमोल डिकुळे – द्वितीय क्रमांक, बुद्धिबळ मोठा गट शिवतेज अमोल भोसले – द्वितीय क्रमांक

विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर मनोज राऊत, पंचायत समिती करमाळाचे गटविकास अधिकारी कदम, तसेच गटशिक्षण अधिकारी नितीन कदम यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

घोटी ग्रामपंचायतचे सरपंच विलास काका राऊत पाटील, ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जालिंदर म्हेत्रे आणि शा.व्य.स. सर्व सदस्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे परिश्रम यांचे कौतुक केले.

या सर्व विजयी विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, संपूर्ण घोटी गाव त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत आहे. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवर्ग, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा विजय अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. घोटी शाळेचा हा अभिमानास्पद विजय संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आणि गौरवाचा क्षण आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *