करमाळा प्रतिनिधी

करमाळा पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्तित नसतात त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते. जेवायला सुट्टी म्हणून एक दोन-तास बाहेर वावरत असतात. करमाळा पंचायत समिती मध्ये बायोमॅट्रिक मशीन असून सुद्धा ती बंद अवस्थेत आहे. वरिष्ठ अधिकारी bdo यांना याची कल्पना दिली असता त्यांच्याच आशीर्वादाने अधिकारी व कर्मचारी असे बेलगाम वागतात. नागरिकांशी उद्धट वागतात आणि घरी बसून मोबाईल वरून घरूनच हजेरी लावतात. या bdo च्या आशिर्वादामुळे एक शिस्तबंध करमाळा पंचायत समितीची वाट लागली आहे. कोणताच शासन आदेश हे  bdo पाळत नाही असे गँभीर आरोप पुराव्या निशी जिल्हा परिषद ceo यांच्या कडे लेखी तक्रार केली होती. त्याच तक्रारीला जिल्हा परिषद डेपोटी ceo यांनी दखल घेत करमाळा पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ज्ञानमाता माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य करमाळा तालुका अध्यक्ष रोहित सोरटे यांनी बोलताना सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *