
करमाळा प्रतिनिधी
जिओ मोबाईलची रेंज व्यवस्थित नाही त्याबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी नियोजन करावे अशी मागणी व्यापारी राधेश्याम देवी व बंडु परदेशी यांनी केली आहे.
गेले कित्येक दिवस झाले जिओ फोन वरून दुसऱ्याला फोन लागत नाही किंवा तिकडुन फोन येत नाही, फोन आला तर आवाज येत नाही. शासकीय तसेच व्यापारी वर्गाला यामुळे खुप त्रास होत आहे. याबाबत संबंधित अधिकारी व्यवस्थित उत्तर देत नाही तरी जियो कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी राधेश्याम देवी व बंडु परदेशी यांनी केली आहे.
