
करमाळा प्रतिनिधी
बालदिन भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. बालदिनाचे उद्दिष्ट म्हणजे मुलांबद्दल प्रेम आणि आदर वाढवणे, जेणेकरून ते त्यांचे बालपण आनंदी आणि सुरक्षित वातावरणात जगू शकतील.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये बालदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना औक्षण करून त्यांचे स्कूल मध्ये स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या हस्ते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदात बालदिन साजरा केला.
