करमाळा प्रतिनिधी
झरे येथील रयत क्रांती संघटनेचे मार्गदर्शक गोरख बाबुराव जाधव (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्व.गोरख जाधव हे गरजू रुग्णांना विविध आजारावर मोफत आयुर्वेदिक उपचार करत असे. ते सर्वत्र “आण्णा” या नावाने परिचित होते.
त्यांच्यावर झरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते गणेश जाधव व बापू जाधव यांचे ते वडील होत.