
करमाळा प्रतिनिधी
गौंडरे 2:30 ला करमाळा परंडा कोळगाव मार्गे सुटणारी बस वेळेवर येत नसल्यामुळे डॉक्टर हेडगेवार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. बस वेळेवर सुटल्यास परांडा येथून परत आमच्या शाळेवर बरोबर नेहमीप्रमाणे साडेचारला येते आमची प्रशाला चार वाजता सुटते. काल ही बस आमच्या प्रशालेत सहा वाजून नऊ मिनिटांनी आली त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास उशीर होत आहे. कृपया 2:30 सुटणारी बस वेळेवर सोडावी अशी मागणी विद्यार्थी पालकांनी केली आहे.
